‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ चा टीझर प्रदर्शित
महा एमटीबी   01-Dec-2018

 


 
 
 
मुंबई : माणसांचे इमोशन्स चेंज करायला शब्दच पुरेसे आहेत आणि याची झलक सर्व लाईन व्यस्त आहेत या सिनेमाचा टीझरमधून दिसते. प्रदिप रघुनाथ मेस्त्री दिग्दर्शित सर्व लाईन व्यस्त आहेत या सिनेमाचा टीझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. अमोल उतेकर आणि स्टेलारीया स्टुडिओने या सिनेमाची निर्मिती केली आहे.
 

प्रेमप्रकरण आणि लग्न, प्रेयसी आणि बायको यांच्यामध्ये नेमका काय फरक आहे? हे मजेशीररित्या या सिनेमाच्या टीझरमध्ये दाखवण्यात आले आहे. सिद्धार्थ जाधव, सौरभ गोखले, संस्कृती बालगुडे, स्मिता शेवाळे, हेमांगी कवी, नीथा शेट्टी-साळवी, राणी अग्रवाल यांच्या भन्नाट अभिनयाची झलक या टीझरमधून प्रेक्षकांना पाहायला मिळते.

 
 
 

आदर्श शिंदेच्या आवाजातील एक नवीन, दमदार गाणे या टीझरमधून ऐकायला मिळते. या गाण्याविषयी प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. टीझरच्या शेवटी गुरुच्या भूमिकेत असलेल्या महेश मांजरेकर यांचा अभिनय आणि डायलॉग यामुळे मराठी सिनेसृष्टीत आणखी एका मसालेदार सिनेमाची भर पडणार असल्याचे दिसते. यामुळे प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन होणार यात शंका नाही. पुढच्या वर्षी ११ जानेवारी रोजी हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/