प्रियांका-निक झाले विवाहबद्ध!
महा एमटीबी   01-Dec-2018

 


 
 

जोधपूर : बॉलिवुड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास यांच्या प्रेमसंबंधांच्या चर्चा गेल्या अनेक दिवसापासून सुरु होत्या. अखेर आज या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. आज १ डिसेंबर रोजी हे दोघे विवाहबंधनात अडकले आहेत. ख्रिश्चन पद्धतीने हा विवाहसोहळा झाला असून २ डिसेंबर रोजी हिंदू पारंपारिक पद्धतीने हे दोघे पुन्हा लग्न करणार आहेत. राजस्थानमधील जोधपूरच्या उमेद भवनमध्ये प्रियांका निक यांचे लग्न पार पडले. प्रियांका आणि निकचे खास मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक या लग्नसोहळ्याला उपस्थित होते.

 

दीपिका-रणवीर यांच्या लग्नानंतर बॉलिवुडप्रेमींना प्रियांका-निकच्या लग्नाचे वेध लागले होते. प्रियांका-निकच्या लग्नाला जेवणापासून ते या जोडीच्या कपड्यांपर्यंत सारखं काही खास होतं. अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिच्या मिस वर्ल्ड ते आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी असा प्रवास आजवर केला. या प्रवासा दरम्यान तिला निक जोडीदार म्हणून लाभला आणि प्रियांकाने लग्नाचा निर्णय घेतला. लग्नात येणाऱ्या परदेशी पाहुण्यांना भारतीय पारंपारिक पद्धतीचे कपडे घालता यावेत यासाठी प्रियांकाने खास फॅशन डिझायनरची नेमणूक केली असल्याचे कळते. इतकंच नाही तर या वऱ्डाही मंडळींसाठी उमेदभवनापर्यंत पोहोचण्यासाठी हेलिकॉप्टर आणि हेलिपॅडचीही सोय केली होती. या लग्नसोहळ्याला कडक सुरक्षा होती. प्रियांका-निकच्या लग्नाचे फोटो प्रसिद्ध होऊ नयेत याकडे विशेष लक्ष देण्यात आले होते. काही दिवसांनंतर मुंबई आणि दिल्लीत जोडीच्या लग्नाच्या ग्रँड रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/