ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग काळाच्या पडद्याआड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Nov-2018
Total Views |



पुणे: ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचे शुक्रवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्या ७९ वर्षाच्या होत्या. लालन सारंग यांच्या जाण्याने सिनेसृष्टीत आणि मराठी नाट्यरसिकांमध्ये शोककळा पसरली आहे. एक बंडखोर अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख होती. आपल्या बहारदार अभिनयाने जवळ जवळ ५ दशकांचा काळ गाजवत रंगभूमीवर आपला वेगळा ठसा उमटवला होता.

 

लालन सारंग यांचा जन्म २६ डिसेंबर १९४१ रोजी गोव्यात झाला. त्या १९६८पासून नाट्यक्षेत्रात काम करत होत्या. अनेक गाजलेल्या नाटकांमध्ये त्यांनी महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. 'सखाराम बाइंडर' मधली चंपा, 'सहज जिंकी मना' नाटकांमधील मुक्ता, 'आक्रोश' नाटकामधील वनिता आणि 'आरोप' नाटकामधील मोहिनी या त्यांच्या नावाजलेल्या भूमिका आहेत. तसेच 'कमला', 'गिधाडे', 'रथचक्र' यांसारख्या नाट्य परंपरांना छेद देणाऱ्या नाटकांमधील त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रचंड गाजल्या. त्यांनी ‘जंगली कबुतर’, ‘खोल खोल पाणी’, ‘घरटे आपुले छान’, ‘बेबी’, ‘सूर्यास्त’, ‘कालचक्र’ या नाटकांमध्येही त्यांनी आपली भूमिका चोख बजावली.

 

लालन सारंग यांनी नाटकच नाहीतर मालिका आणि चित्रपटांमध्येही कामे केली. ‘सामना’, ‘हा खेळ सावल्यांचा’ या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. तसेच रथचक्र या हिंदी मालिकेमध्येही त्यांनी काम केले आहे. नाटकांच्या माध्यमातून साकारलेल्या भुमिकांमधून त्यांनी केवळ मनोरंजन न करता सामाजिक संदेश देण्यावर त्यांचा नेहमी कटाक्ष होता.

 

अभिनयासोबतच त्यांनी लेखनामध्येही त्यांचा हातखंडा होता. त्यांनी ‘नाटकांमागील नाटय़’, ‘मी आणि माझ्या भूमिका’, ‘जगले जशी’, ‘बहारदार किस्से आणि चटकदार पाककृती’ ही पुस्तकेदेखील लिहीली. कणकवली येथे झालेल्या ८७व्या मराठी नाट्यसंमेलनाच्या अदक्षपदाही भूषवले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@