पुन्हा अवतरणार आठवणीतला ‘पिंजरा’
महा एमटीबी   07-Nov-2018

 


 
 
 
मुंबई : ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा सिनेमा प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. या सिनेमातील ‘तुम्हावर केली मी मर्जी बहाल’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. ‘पिंजरा’ या सिनेमातील हे मूळ गाणे असून ते या सिनेमाच्या निमित्ताने रिक्रिएट करण्यात आले आहे. मूळ गाण्याच्या चालीला कोणताही धक्का न लावता नवीन कलाकारांवर हे गाणे चित्रित करण्यात आले आहे. ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या सिनेमात अभिनेता सुमीत राघवन यांनी डॉ. श्रीराम लागूंची भूमिका साकारली आहे. सुमीत राघवन यांनी ट्विट करून या गाण्याविषयी प्रेक्षकांना माहिती दिली.
 
 
 
 

‘पिंजरा’ हा डॉ. श्रीराम लागूंचा त्या काळात प्रचंड गाजलेला सिनेमा होता. तुम्हावर केली मी मर्जी बहाल हे गाणेही त्या काळात प्रचंड गाजले होते. आजही ते अनेकांच्या स्मरणात आहे. अभिनेत्री अमृता खानविलकर हिने या गाण्यात अभिनेत्री संध्या यांची भूमिका साकारली आहे. अमृताने संध्या यांच्याप्रमाणेच या गाण्यात हावभाव करण्याचा प्रयत्न केला आहे. अमृताने केलेला हा प्रयत्न प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो का? हे पाहण्यासाठी सिनेमा प्रदर्शित होण्याची वाट पाहावी लागणार आहे. येत्या ८ नोव्हेंबर रोजी आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा सिनेमा प्रदर्शित होतोय.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/