फटाके फोडल्यामुळे मुंबईत पहिला गुन्हा दाखल
महा एमटीबी   07-Nov-2018

 


 
 
 
मुंबई : फटाके फोडण्याची वेळ न पाळल्यामुळे ट्रॉम्बे येथे दोन अज्ञात तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन तरुणांनी ट्रॉम्बे येथील एका सोसायटीच्या आवारात मध्यरात्री फटाके फोडले होते. या दोन अत्रात तरुणांवर गुन्हा दाखल केला असून पोलीस सध्या त्यांचा शोध घेत आहेत.
 

दिवाळीत रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके वाजवावेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आले होते. न्यायालयाच्या या निर्देशाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यभरात पोलिसांची विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत. अभ्यंगस्नानाच्या दिवशी मध्यरात्री या दोन अज्ञात तरुणांनी फटाके फोडून या निर्देशाचे उल्लंघन केले. फटाके फोडण्याची वेळ न पाळल्याने गुन्हा दाखल करण्याची ही राज्यभरातील पहिलीच घटना आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/