ही ठरणार अयोद्धेची ओळख; आदित्यनाथ योगी यांची घोषणा
महा एमटीबी   07-Nov-2018
 
 

उत्तरप्रदेश : फैजाबादचे नामांतरण अयोध्या करण्याच्या घोषणेनंतर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोद्धेची ओळख निर्माण करण्यासाठी प्रभू श्रीरामचंद्रांचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

 

ते म्हणाले, प्रभू श्रीरामचंद्रांचा पुतळाच ही अयोद्धेची खरी ओळख ठरेल. हा पुतळा दर्शनीय भागात उभारला जाणार आहे. त्यासाठी जागेच्या शोधात आम्ही आहोत. भाविकांना पूजेसाठी मुर्ती असेलच मात्र, श्रीरामाची भव्य मुर्ती अयोद्धेची ओळख ठरणार आहे.’’ बुधवारी प्रसार माध्यमांशी बोलताना योगी आदित्यनाथ यांनी रामाचा भव्य पुतळा अयोध्येत उभारला जाईल, असे स्पष्ट केले.

 
 
राम मंदिरप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जानेवारीमध्ये लागणार आहे. राम मंदिर झाले पाहिजे अशी मागणी सगळ्याच स्तरांतून होते आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी श्रीरामाचा पुतळा अयोध्येत उभारला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहेशरयू नदीच्या काठावर हा पुतळा उभारला जाऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या भव्य पुतळ्याचे काम शिल्पकार राम सुतार यांनाच दिले जाण्याची शक्यता आहे. त्यांच्याशी यासंबंधी योगी आदित्यनाथ यांनी चर्चा केल्याचेही समजते आहे
 
 

सीएसआर योजनेतून उभारणार निधी

 

सार्वजनिक, खासगी कंपन्यांच्या माध्यमातून सीएसआरद्वारे या पुतळ्यासाठी निधी गोळा केला जाणार. श्रीरामांच्या पुतळ्यासह या ठिकाणी नवी अयोध्या वसवण्याचाही योगी आदित्यनाथ यांचा मनसुबा आहे. येथे सेव्हन डी तंत्रातील रामलीला, रामकथा सांगणारी एक गॅलरी आणि रामकथा स्मारकही येथे उभारले जाणार आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/