नादुरुस्त चाकांवर धावली हावडा एक्प्रेस
महा एमटीबी   07-Nov-2018
 
 

जमशेदपूरमुंबई-हावडाला सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या तिसऱ्या वातानुकूलीत बोगीची चाके नादुरुस्त असल्याचे माहीत असूनही दोनशे किलोमीटर धावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रेल्वे अधिकाऱ्यांचा आणखी एक मोठा हलगर्जीपणा यामुळे उघडकीस आला आहे. 

 

 

मुंबईतीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून निघालेली हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस टाटानगर स्थानकावर आली असता तिसऱ्या बोगीमध्ये चाकांचा आवाज येत असल्याची तक्रार प्रवाशांनी केली. प्रवाशांनी यामुळे गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडे दुर्लक्ष करत गाडी दोनशे किलोमीटर सुरूच ठेवली. रेल्वेचा वेग कमी करण्याच्या सूचना मोटरमनला देण्यात आल्या होत्या.
 
 


रोजच्या वेळापत्रकाप्रमाणे सीएसएमटीहून सुटल्यानंतर ही एक्स्प्रेस सोमवारी .५५ मिनिटांनी टाटनगरला जायला हवी होती. मात्र, ही गाडी १० तास उशिराने पोहोचली. ही ट्रेन वेगात महालीमुरुम स्टेशनवरून गेल्यानंतर काहीतरी बिघाड झाल्याची माहिती चक्रधरपूर परिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आली होती. ट्रेन कधीही रुळांवरून घसरू शकते, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांना मिळाली. यानंतर लगेच टाटानगरच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात संबंधित सूचना देण्यात आली. दुरुस्त करणारे कर्मचारी टाटानरगला पोहोचले होते. नादुरुस्त कोचची पाहणीही करण्यात आली. यावेळी इतर गाड्या टाटानगरमध्ये खोळंबल्या. याचा दबाव आल्याने पाहणी करुन कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांना अहवाल दिला. नादुरुस्त स्थितीत गाडी हावडा स्थानकात पाठवण्यात आली. दरम्यान प्रवाशांच्या सुरक्षेकडे रेल्वेने दुर्लक्ष केल्याची टीका रेल्वे प्रवाशांनी केली आहे.

 
  

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/