रावेर पीपल्स बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. राजेंद्र पाटील
महा एमटीबी   07-Nov-2018

 
रावेर : रावेर पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी मोरगाव येथील डॉ. राजेंद्र पाटील यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहेे.
 
रावेर पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी संचालक मंडळाची विशेष सभा बँकेच्या सभागृहात झाली. यात डॉ. राजेंद्र नारायण पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
 
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक एस.एफ.गायकवाड यांनी काम पाहिले. त्यांना बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश पाटील यांनी सहकार्य केले. सभागृहात सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
 
बिनविरोध निवडीची घोषणा होताच बँकेचे उपाध्यक्ष सूर्यभान चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नीळकंठ चौधरी, माजी आ. शिरीष चौधरी, बँकेचे संचालक प्रल्हाद महाजन, ज्ञानेश्वर महाजन, शंकर राऊत, सोपान पाटील, पंकज पाटील, संजय वाणी, अशोक महाजन, बिसन सपकाळ, जनार्दन पाचपांडे, अ‍ॅड. प्रवीण पाचपोहे आदींनी त्यांचे अभिनंदन
केले.