पंतप्रधान मोदींनी देशवासियांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा !
महा एमटीबी   07-Nov-2018

 

 
 
 
नवी दिल्ली : देशभरात सगळीकडे दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. दिवाळीनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासियांना ट्विटरच्या माध्यमातून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
 
 
 
 
 

दिवाळीचा हा सण देशवासियांसाठी सुख आणि समृद्धी आणो. माझी इच्छा आहे की दिव्यांच्या या तेजोमय प्रकाशाने देशातील प्रत्येक घर आणि कुटुंब उजळून निघावे. तसेच दिव्यांचा हा प्रकाश जगभरात पसरावा.अशा शब्दांत देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशभरातील जनतेला दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

 
 
 

पंतप्रधान मोदींनीही देशातील नागरिकांनी ट्विटरद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. ‘सर्व देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा! माझी इच्छा आहे की प्रकाशाचा हा पवित्र उत्सव सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी आणो.असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. 

 
 
 
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विटरच्या माध्यमातून सर्वांना शुभेच्छा दिल्या. ‘ही दीपावली सर्वांना आनंदमयी, आरोग्यदायी, सुख-समृद्धी प्रदान करणारी ठरो.’ असे त्यांनी ट्विट केले आहे.
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/