पाचोरा नगरपरिषद कर्मचार्‍यांची दिवाळी
महा एमटीबी   07-Nov-2018
पाचोरा : पाचोरा नगरपरिषद सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना सहाव्या वेतन आयोगाचा उर्वरित संपूर्ण फरक पाचोरा नगरपरिषदतर्फे अदा करण्यात आला असून कार्यरत कर्मचारी वर्ग -3 यांनादेखील सहाव्या वेतन आयोगाचा 100% फरक अदा करण्यात आला आहे.
 
त्याचप्रमाणे चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांनाही दिवाळी अ‍ॅडव्हान्स म्हणून प्रत्येकी कर्मचार्‍यास 12,500/- हजार रुपये वाटप करण्यात आले आहे.
 
लाभ मिळाल्याबद्दल पाचोरा नगरपरिषद कर्मचार्‍यांतर्फे आ. किशोर पाटील, नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे, मुख्याधिकारी सोमनाथ आढाव, उपमुख्याधिकारी राजेंद्र पाटील यांचे आभार व्यक्त केले.