एनएफपीई संघटनेतर्फे पोस्टात काळ्या फिती लावून निषेध
महा एमटीबी   07-Nov-2018

 
जळगाव, 6 नोव्हेंबर - अलाहाबाद व जत, सांगली येथे पोस्टल कर्मचारी वर्गावर जो भ्याड हल्ला करण्यात आला, त्या हल्ल्याचा सोमवारी जळगाव हेड पोस्ट ऑफिस येथे जाहीर निषेध करण्यात आला.
 
ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन नवी दिल्ली व मुंबईच्या आदेशानुसार संंघटनेतर्फे सचिव लक्ष्मीकांत ठाकूर व भूषण पाटील यांच्या नेतृत्वाखाली काळ्या फिती लावून काम केले.
 
हे आंदोलन जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव, अमळनेर, पारोळा, कासोदा, एरंडोल, धरणगाव व पाळधी येथील पोस्टल क्लार्क, पोस्टमन व ग्रुप डी वर्गांनी यशस्वी केले.