ग्रंथालयांनी राजाराम मोहन रॉय ग्रंथालयप्रतिष्ठान योजनेचा लाभ घ्यावा
महा एमटीबी   07-Nov-2018
जळगाव, 6 नोव्हेंबर - केंद्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत राजाराम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या असमान निधी योजनेअंतर्गत राज्यातील शासन मान्य सार्वजनिक ग्रंथालयाच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसहाययाच्या विविध योजना राबविण्यात येतात.
 
असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी यासंदर्भात अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कार्यान्वित असलेल्या अर्थसहायाच्या असमान निधी योजनांमधून ग्रंथालय संचालनालयामार्फत दरवर्षी अर्थसहाय करण्यात येते. यासंदर्भातील नियम, अटी आणि अर्जाचा नमुना www.rrrlf.nic.in या प्रतिष्ठानच्या संकेतस्थळावर उपलबध आहे.
 
 
असमान निधी योजनेअंतर्गत सन 2018-19 साठी ग्रंथालय सेवा देणार्‍या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधन साम्रगी, फर्निचर, इमारत बांधकाम आणि इमारत विस्तार यासाठी असमान निधीतून अर्थसहायय देण्यात येणार आहे.
 
याशिवाय राजाराम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ज्ञान कोपरा विकसित करण्यासाठी अर्थसहाय, महोत्सवी वर्ष जसे 50 /60/75/100/125/150 वर्ष साजरे करण्यासाठी अर्थसहाय, राष्ट्रस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग आणि जागरुकता कार्यक्रम आयोजनासाठी अर्थसहाय, दिव्यांग वाचकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यासाठीचे अर्थसहायय, हस्तलिखिताचे कॉपीराईट, दुर्मिळ ग्रंथ व दस्ताऐवज, जुनी नियतकालिके, ऐतिहासिक रेकॉर्डस आणि सामग्री यांचे डिजिटलायझेशन करण्यासाठी अर्थसहाय, डिजिटल माहिती सेवा विभाग प्रस्थापित करण्यासाठी सार्वजनिक ग्रंथालयांना अर्थसहाय, स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सार्वजनिक ग्रंथालयासाठी अर्थसहाय देण्यात येणार आहे.
 
 
प्रस्ताव चार प्रतीमध्ये संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात 30 नोव्हेंबरपर्यंत करावे, असे आवाहन ग्रंथालय संचालनालयाचे संचालक सुभाष राठोड प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.