घरगुती गॅस सिलिंडर ओमनीत भरणारा गजाआड
महा एमटीबी   07-Nov-2018

 
पारोळा, 6 नोव्हेंबर - घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर मधील गॅस ओमणीच्या टाकीमध्ये इलेक्ट्रिक मोटारीने भरणार्‍या इसमास पारोळा पोलिसांनी रंगेहात पकडले. ही कारवाई मंगळवारी 1 वाजेच्या सुमारास सिद्धिविनायकनगरात करण्यात आली.
 
पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातुन 14 गैस सिलेंडर, एक ओमणी, गॅस भरण्याची मोटार, असे 1 लाख 39 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
 
पारोळा येथील सिद्धिविनायक नगरातील मोकळ्या बखळ जागेवर घरगुती वापराचे गॅसचा इंधन म्हणून वापर होत असून ओमणीत भरत असल्याची माहिती मिळाली.
 
ही माहिती मिळताच पो.उपनिरक्षक अजितसिंग देवरे, सुधाकर लहारे, पो का नरेंद्र पाटील,राहुल चौधरी,पो ना विनोद साळी,सागर पाटील , पुरवठा विभागाचे अनिल पाटील यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली असता, सदर ठिकाणी एक इसम घरगुती गॅस सिलेंडरमधील गॅस एच पी, इंडेन, भारत कंपनीच्या गॅस सिलेंडर मध्ये मोटारीच्या साह्याने भरताना आढळून आले.
 
त्यांची विचारपूस केली असता गॅस भरणार्‍याचे नाव आणि गाडी मालकाचे नाव सुनील रमेश मराठे राहणार सिद्धिविनायकनगर, (पारोळा) त्यांच्याकडून 1 लाख रुपये किमतीची सिल्वर मारोती ओमणी 15 हजार किमतीची गॅस भरण्याची मोटार, तीन पिस्टन पंप त्याला पिवळ्या रंगाचा नळ्या तसेच एच़पी, भारत,इंडेन कंपनीचे घरगुती वापराचे 14 गॅस सिलेंडर, असा 1 लाख 39 हजार मुद्देमाल आरोपीकडून हस्तगत करण्यात आला.
 
या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात जिवनाश्यक वस्तु अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पो.उपनिरक्षक सुधाकर लहारे करीत आहे.