वृत्तपत्र विक्रेता मंडळातर्फे मिठाई, फरसाण वाटप
महा एमटीबी   07-Nov-2018

 
जळगाव, 6 नोव्हेंबर - जळगाव शहर वृत्तपत्र विक्रेता मंडळातर्फे दिवाळीनिमित्त वृत्तपत्र वाटप करणारे व विक्रेता बंधू यांच्यासाठी मिठाई व फरसाण वाटप कार्यक्रम केमिस्ट भवन येथे झाला.
 
प्रमुख पाहुणे आ. सुरेश भोळे, जळगाव जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुनील भंगाळे, बाहेती कॉलेजचे संचालक रोहन बाहेती, नरेश खंडेलवाल, शामकांत वाणी आदींच्या हस्ते 185 जणांना मिठाई व फरसाण वाटप करण्यात आले.
 
आ. भोळे यांनी विक्रेता बांधवांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. सुनील भंगाळे यांनी मंडळाच्या कार्याचे कौतुक केले. नरेश खंडेलवाल यांनी आपल्या कमाईतील दहावा भाग सत्कर्मासाठी द्यावा, ही भारतीय संस्कृती असल्याचे सांगितले.
 
रोहन बाहेती यांनी वृत्तपत्र विक्रेता बांधवांची मुले, तसेच वाटप करणार्‍यांना शैक्षणिकदृष्ट्या काही अडचण आल्यास ती सोडविण्याचे आश्वासन दिले.
 
प्रास्ताविक गोपाळ चौधरी यांनी केले. मंडळाची माहिती अशोक डहाळे यांनी दिली. आभार रवींद्र जोशी यांनी मानले. यशस्वीतेसाठी मंडळाचे उपाध्यक्ष नितीन चौधरी, तुषार चौधरी, हरीष चौधरी, अनिल पाटील, संतोष वाणी, संजय जोशी, प्रदीप वाणी, प्रमोद चौधरी, मंडळाचे सचिव विजय कोतकर, शरद मोरे, भालचंद्र वाणी यांनी
परिश्रम घेतले.