‘या’ पत्रामुळे येणार कॉंग्रेस अडचणीत !
महा एमटीबी   05-Nov-2018
 
 

नवी दिल्ली : केंद्र सरकारने उर्जित पटेल यांना पाठवलेल्या नोटीशीवरुन टीका करणाऱ्या कॉंग्रेसला प्रत्यूत्तर देण्यासाठी पंडीत नेहरू पंतप्रधान असतानाच्या काळातील एका पत्राचाही फायदा होणार आहे. केंद्र सरकारच्या विविध उपाययोजनांसाठी काही नियम शिथिल करावेत, जनहितार्थ निर्णयांसाठी आरबीआयच्या निर्णयांमध्ये सरकार हस्तक्षेप करू शकते, अशी नोटीस उर्जित पटेल यांना पाठवली होती. त्याला विरोध करत कॉंग्रेसने सरकार आरबीआयची स्वायत्तता धोक्यात आणत असल्याची टीका केली होती. मात्र, सरकार आणि रिझर्व्ह बॅंक यांच्यात तणाव निर्माण होण्याची ही काही पहीली वेळ नाही. १९३७मध्येही असे वाद निर्माण झाले होते. त्यावेळी सर ऑब्सबॉर्न यांनी व्याज आणि विनिमय दरांवरुन सरकारशी मतभेद झाल्यामुळे राजीनामा दिला होता. इंग्रजी वृत्तपत्र टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत माहिती दिली आहे.

 

देशाचे पहिले माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनीही तत्कालीन आरबीआय गव्हर्नर सर बेनेगल रामा राव यांच्याशी वाद घातला होता. त्यामुळे रामा राव यांना राजीनामा द्यावा लागला होता. सर बेनेगल रामा राव हे मुलकी खात्यात अधिकारी होते. स्वतंत्र भारताचे ते चौथे गव्हर्नर बनले. साडेसात वर्षे ते या पदावर होते. त्यावेळी टी टी कृष्णमाचारी हे अर्थमंत्री होते. आरबीआय हा अर्थमंत्रालयाचा एक भाग असल्याचे वक्तव्य टीटीके यांनी केले होते. माजी पंतप्रधान पंडित नेहरू यांनीही त्यांच्या सुरात सुर मिसळला होता. राव यांनीही टीटेके आणि नेहरू हे आरबीआयच्या व्यवहारांमध्ये अडथळा आणत असल्याचेही म्हटले होते.

 

नेहरू यांनी त्यावेळेस राव यांना एक पत्र लिहिले होते. आरबीआय ही सरकारला मार्गदर्शन आणि सल्ले देणारी संस्था आहे. आरबीआयला सरकारी आदेशांचे पालन करायलाच हवे. जेव्हा गव्हर्नरला वाटेल कि ते या पदावर राहण्यास योग्य नाहीत तेव्हा ते राजीनामाही देऊ शकतात.’, या आशयाचे पत्र त्यांनी राव यांना लिहीले होते. यानंतर राव यांनी राजीनामा दिला. हाच मुद्दा कॉंग्रेसला उर्जित पटेल यांच्याशी झालेल्या मोदी सरकारच्या वादावरुन तोंडघशी पाडू शकतो.

 

सरकारविरोधात धोरणे नको : नेहरू

नेहरू यांनी लिहिलेल्या पत्रात केंद्राच्याविरोधात आरबीआयने धोरणे ठरवू नयेत, असे म्हटले होते. सरकार धोरणे ठरवेल. तुम्ही ज्यावेळी भेटलात त्यावेळी या गोष्टीला होकार दर्शवला होता, आता त्याला विरोध करत आहात, असा उल्लेख या पत्रात होता.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/