२.०ची ‘रेकॉर्ड ब्रेक’ कमाई
महा एमटीबी   30-Nov-2018नवी दिल्ली : रजनीकांत आणि अक्षय कुमार यांचा बहिचर्चित २.०ने पहिल्याच दिवशी चांगली कमाई केली आहे. हा चित्रपट ३ भाषेमध्ये भारतात प्रदर्शित झाला. त्यानंतर हिंदीमध्ये या चित्रपटाने २९ करोड रुपये कमावले आहेत. तर तिन्ही भाषांमध्ये जवळजवळ ६० करोडच्या आसपास कमाई केली आहे. प्रदर्शित होण्याआधीच ऍडव्हान्स बुकिंगमध्येही रेकॉर्ड बुकिंग केली होती. 'बुक माय शो'च्या वेबसाइटवर १० लाखांपेक्षा जास्त तिकिटांची बुकिंग झाली होती.

 

२.० चित्रपटामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा चांगला वापर करण्यात आला आहे. आकडेवारी पाहता हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. दाक्षिणात्य चित्रपट क्षेत्रात साय-फाय चित्रपटासाठी प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक एस. शंकर यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. समीक्षकांकडून मात्र या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. लोकांमध्ये चित्रपटाच्या ग्राफिक्सची चर्चा आहे, परंतु कथा कमकुवत असल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटाचे बजेट ५५० करोड सांगितले जात आहे. त्यामुळे एवढा अवाढव्य एकदा हा चित्रपट कसा पार करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

 

२.० या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच ३७० करोडचा एकदा पार केला आहे. चित्रपटाने सॅटेलाइट, डिजिटल आणि डिस्ट्रिब्युशनचे हक्क मिळून प्रदर्शनापूर्वीच ३७०चा एकदा पार केला होता. विशेष म्हणजे रजनीकांतपेक्षा अक्षय कुमारचे काम सर्वांना आवडते आहे. त्याच्यासाठी हा चित्रपट खूप खास आहे. त्याने या चित्रपटामध्ये निगेटिव्ह व्यक्तिरेखा साकारली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/