'इस्रो'ने यासाठी प्रक्षेपित केला हा उपग्रह
महा एमटीबी   29-Nov-2018
 
 

नवी दिल्ली : जगातील अवकाश संशोधन क्षेत्रात आघाडीची संस्था म्हणून ओळख असलेल्या भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रो भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहेइस्रोने गुरुवारी सकाळी पीएसएलव्ही-सी-४३प्रक्षेपकाद्वारे एकावेळी तब्बल ३१ उपग्रह अवकाशात सोडले.

 

यात प्रक्षेपित केलेल्या उपग्रहांमध्ये हायसिसहा भारताचा अत्याधुनिक पृथ्वी निरीक्षण करणारा उपग्रह असून अन्य उपग्रहांपैकी आठ देशांचे तीस छोटे उपग्रह आहेत. यात अमेरिकेचे सर्वाधिक २३ उपग्रह आहेतहायसिस दुर्मिळ प्रकारातला अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असा उपग्रह आहे. जगात मोजक्या देशात अशा प्रकारचे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. अनेक देश अशा प्रकारचा उपग्रह अवकाशात पाठवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे इस्रोचे चेअरमन के.सिवन यांनी सांगितले.

 
 
 

आंध्रप्रदेशच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन या अवकाश तळावरुन पीएसएलव्ही-सी-४३ने सकाळी नऊ वाजून ५८ मिनिटांनी आकाशात झेप घेत पीएसएलव्हीचे ४५ वे उड्डाण पूर्ण केले. आकाशातील दोन वेगवेगळया कक्षांमध्ये हे उपग्रह सोडण्यात येणार आहेत. ही प्रक्रिया ११२ मिनिटांची असणार आहे. जगात एकाचवेळी सर्वाधिक उपग्रह प्रक्षेपित करण्याचा विक्रम इस्रोच्या नावावर आहे. इस्रोने मागच्यावर्षी १५ फेब्रुवारी २०१७ रोजी सर्वाधिक १०४ उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले.

 
 
 

हायसिस प्रदुषणावर लक्ष ठेवणार

 

भारतात कारखान्यांमधून मोठया प्रमाणावर प्रदूषण होते. हायसिसच्या मदतीने आता या प्रदूषणावर लक्ष ठेवता येणार आहे. पृथ्वीच्या पुष्ठभागाचे निरीक्षण करणाऱ्या हायसिसच्या मदतीने जमीन, पाणी, वनस्पति आणि अन्य माहिती मिळवता येईल. प्रदूषणाची माहिती देण्यामध्ये या उपग्रहाची सर्वात जास्त मदत होणार आहे. ३८० किलो वजनाच्या हायसिसचे आयुष्य पाच वर्षांचे असणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/