‘माऊली’च्या ट्रेलरसारखा टेरर नाय!
महा एमटीबी   29-Nov-2018

 


 
 
मुंबई : अभिनेता रितेश देशमुख याच्या ‘माऊली’ या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ‘लय भारी’ या सिनेमाच्या यशानंतर रितेश देशमुख ‘माऊली’ हा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रितेश देशमुख याची पत्नी जेनेलिया देशमुखने या सिनेमाची निर्मिती केली आहे. आषाढी एकादशी निमित्त या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. तर कार्तिकी एकादशीनिमित्त 'माझी पंढरीची माय' हे गाणे प्रदर्शित झाले होते. अभिनेता अक्षयकुमार याने हे गाणे ट्विट केले होते.
 
 
 
 
 
 

आता दिग्दर्शक करण जोहरने आणि बॉलिवुड अभिनेत्री क्रिती सेनन हिने माऊलीचा ट्रेलर ट्विट करून रितेशला सिनेमासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तर अभिनेता सलमान खानने हा ट्रेलर ट्विट करून सर्वांचा 'माऊली' आणि आपला भाऊ येतोय, एन्ट्रीवर शिट्टी नक्कीच असे ट्विटमध्ये लिहिले आहे. त्यावर “भाऊ भरपूर प्रेम” अशी प्रतिक्रिया देत रितेशने सलमानचे आभार मानले. यापूर्वी रितेशच्या ‘लय भारी’ या सिनेमात सलमान खानने पाहुणा कलाकार म्हणून काम केले होते. रितेशने 'माऊली' या सिनेमात माऊली सर्जेराव देशमुख या पोलीस इन्पेक्टरची भूमिका साकारली आहे. अवघ्या महाराष्ट्राची लाडकी संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी 'माऊली' या सिनेमाला संगीत दिले आहे. येत्या १४ डिसेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित होईल.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/