‘शक्तिमान’ आता अॅमेझॉन प्राईमवर
महा एमटीबी   28-Nov-2018 
 
 
मुंबई : ९० च्या दशकातील लोकप्रिय मालिका ‘शक्तिमान’ आता प्रेक्षकांना पुन्हा पाहायला मिळणार आहे. अॅमेझॉन प्राईमवर प्रेक्षकांना ही मालिका पाहता येणार आहे. शक्तिमान या मालिकेचे दोन सीझन अॅमेझॉन प्राईमवर उपलब्ध झाले आहेत. अभिनेता मुकेश खन्ना यांची या मालिकेत प्रमुख भूमिका होती.
 

डीडी नॅशनल या वाहिनीवर या मालिकेचे दर रविवारी दुपारी १२ वाजता प्रसारण व्हायचे. ‘गंगाधर’ आणि ‘शक्तिमान’ या दोन्ही भूमिका अभिनेता मुकेश खन्ना यांनी साकारल्या होत्या. १३ सप्टेंबर १९९७ ते २७ मार्च २००५ पर्यंतचा काळ या मालिकेने डीडी नॅशनलवर गाजवला होता. लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली ही मालिका त्या काळात डीडी नॅशनलची सर्वाधिक कमाई करणारी मालिका होती. या काळात शक्तिमान हा सुपरहिरो लहान मुलांमध्ये खूपच लोकप्रिय झाला होता.

 

मालिकेच्या प्रत्येक भागात शेवटी ‘छोटी छोटी मगर मोटी बाते’ च्या माध्यमातून शक्तिमान सामाजिक संदेश द्यायचा. उदाहरणार्थ, रस्त्यावर कचरा फेकू नका, तसेच घरातील वस्तू जागच्या जागी ठेवा. असे संदेश शक्तिमान मुलांना द्यायचा. त्यावर “सॉरी, शक्तिमान पुन्हा असे करणार नाही,” असे म्हणत माफी मागणारी मुले आजही अनेकांच्या स्मरणात असतील. शक्तिमान ही मालिका पुन्हा एकतदा छोट्या पडद्यावर यावी अशी इच्छा अभिनेता मुकेश खन्ना यांनी व्यक्त केली होती. आता अॅमेझॉन प्राईमवर शक्तिमान पाहता येणार असल्यामुळे चाहत्यांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/