‘तुला पाहते रे’ मालिका बंद करण्याची मागणी
महा एमटीबी   27-Nov-2018


 
 
 
 
पुणे : झी मराठी वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ ही मालिका बंद करावी अशी मागणी करण्यात आली आहे. सध्या ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेच्या वेगळ्या विषयामुळे या मालिकेला लोकांची भरभरून पसंती मिळत आहे.
 

पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदन दिले आहे. तुला पाहते रे या मालिकेतून समाज प्रबोधनाचा कोणताही संदेश दिला जात नाही. याउलट महाराष्ट्राची संस्कृती बदलण्याचा ध्यास या मालिकेने घेतला आहे. असा आरोप प्रदीप नाईक यांनी केला.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/