साजिदच्या वागण्याबद्दल पत्नी लाराने दिलेली पूर्वकल्पना : महेश भूपती
महा एमटीबी   27-Nov-2018 
 
 
मुंबई : फिल्ममेकर साजिद खानवर लैंगिक गैरवर्तनाचे गंभीर आरोप आहेत. "साजिदच्या अशा स्वभावाची पूर्वकल्पना मला लाराने दिली होती." असा खुलासा टेनिसपटू महेश भूपती याने केला आहे. २०१० साली अभिनेत्री लारा दत्ताने साजिद खानसोबत हाऊसफुल सिनेमा केला होता. हाऊसफुल सिनेमाच्या सीरीजचा हा पहिला भाग होता. हा पहिला भाग हिट ठरल्याने हाऊसफुल या सिनेमाचे पुढील भाग येत गेले. २०१० साली अभिनेत्री लारा दत्ता आणि टेनिसपटू महेश भूपती हे एकमेकांना डेट करत होते. तेव्हा एका भेटीदरम्यान लाराने साजिद खानच्या गैरवर्तणुकीबद्दल महेशला पूर्वकल्पना दिली होती.
 

सिनेमाच्या सेटवरील महिला कलाकारांशी साजिद खूपच असभ्य वर्तन करतो. त्याचे वागणे खूपच अश्लील असते. लाराच्या सहकलाकार अभिनेत्रींसोबत त्याने असभ्य वर्तन केले होते. हे लाराने मला सांगितले होते. तसेच एकेदिवशी लाराची हेअरड्रेसर तिच्यासोबत मला भेटायला आली होती. तिनेही मला त्याच्या या वर्तणुकीबाबत सांगितले होते. मी त्या दोघींचे बोलणे ऐकून घेतले. तुम्ही याबाबतत आवाज उठवायला हवा. नाहीतर तुम्हीदेखील अशा प्रकरणांमध्ये तितक्याच दोषी ठरता. हे मी लाराला सांगितले होते. तिला त्यावेळी ते पटलेदेखील होते. लाराने लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप असलेल्या एका दिग्दर्शकाबरोबर काम करण्यास नकार दिला. या गोष्टीचा मला अभिमान आहे. असे महेश भूपती याने एका कार्यक्रमात मीटू या मोहिमेविषयी बोलताना म्हटले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/