‘मुंबई-पुणे-मुंबई – ३’ ट्रेलर प्रदर्शित
महा एमटीबी   27-Nov-2018

 


 
 
 
मुंबई : बहुचर्चित सिनेमा ‘मुंबई पुणे मुंबई-३’ चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या सिनेमातील गौरी-गौतम या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या जुन्या ओळखीच्या आहेत. मुंबईची गौरी आणि पुण्याचा गौतम यांच्या प्रेमकहाणीला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या व्यक्तिरेखा साकरणारे स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे या कलाकारांनाही प्रेक्षकांची पसंती लाभली. सिनेमाचे सुरुवातीचे दोन भाग सुपरहिट ठरले. आता या सिनेमाचा तिसरा भाग लवकरच प्रदर्शित होतोय.
 

मुंबई श्रेष्ठ की पुणे? या विषयावर सतत वाद घालणारे, सवयींवरून एकमेकांना टोमणे मारत असले तरी गौतम आणि गौरीमध्ये अतूट नाते जुळते. प्रेक्षकांचेही या सिनेमाशी पहिल्या भागापासूनच असेच काहीसे अतूट नाते जोडले गेल. सिनेमाच्या दुसऱ्या भागात दोघांचे लग्न दाखविण्यात आले होते. आता येणाऱ्या ‘मुंबई पुणे मुंबई – ३’ या तिसऱ्या भागात या दोघांचा संसार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. गौरी गौतमच्या संसारात चिमुकला पाहुणा येणार असल्याने मुंबई आणि पुण्यातील दोन्ही घरांमध्ये पाहुण्याच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू होते.

 
     

 

गंमतीची गोष्ट अशी की गौरीसह गौतमही तिच्याप्रमाणेच गरोदरपणातील खाण्यापिण्याची पथ्ये पाळताना दाखवला आहे. कारण फक्त वी आर प्रेग्नंट’ असे दोघांचे म्हणणे आहे. सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘मुंबई -पुणे-मुंबई – ३ हा सिनेमा येत्या ८ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/