'नाळ' सुपरहिट चालला न व !
महा एमटीबी   23-Nov-2018


 


मुंबई : नागराज मंजुळे आणि झी स्टुडिओ, 'सैराट'नंतर आता 'नाळ' हा चित्रपटदेखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. १६ नोव्हेंबरला प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने आतापर्यंत १४ करोडची कमाई केली आहे. अशी माहिती झी स्टुडिओनेच दिली आहे. चैत्या म्हणजेच बालकलाकार श्रीनिवास पोकळेचा अभिनय हा या चित्रपटाचा लक्षणीय भाग ठरत आहे.

 

या आठवड्यात येणाऱ्या सलग सुट्ट्यांमुळे 'नाळ' हा चित्रपट हाउसफुल्ल चालला आहे. पहिल्याच आठवड्यात १४ करोडची कमाई करत पुन्हा एकदा नागराज मंजुळेंच्या सिनेमाने इतिहास रचला आहे असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. यापूर्वी '...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर'ने देखील गर्दी खेचली होती. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यातला 'नाळ' हा दुसरा सुपरहिट सिनेमा आहे. मराठी चित्रपटांना खरोखर सुगीचे दिवस आले आहेत असे दिसत आहे.

 
 
 

'नाळ' या चित्रपटातील काही ठराविक नावे सोडली तर चैत्याच्या भूमिकेत दिसणारा श्रीनिवास पोकळे याने यापूर्वी कधीच काम केले नव्हते. नागराजच्या सिनेमांचे हे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. श्रीनिवास पोकळेने साकारलेली चैत्याची भूमिका ही सर्वानांच आपलीशी वाटतेय. लहान मुलांचे भावविश्व दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यांनी अचूक मांडले आहे. त्यांनी सिनेमाची कथा आणि पटकथेचे लेखन केले आहे. तर नागराज मंजुळेंनी लिहिलेले संवाद मनाला भावतात. आई आणि मुलाच्या नात्यामधली ही 'नाळ' त्यांनी अतिशय प्रभावीपणे मंडळी आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/