‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत शिवपर्वाचा शेवट!
महा एमटीबी   22-Nov-2018

 

 
 
 
 
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे साक्षात अवघ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत! आजवर शिवकालीन इतिहासावर आधारित अनेक कलाकृती सादर झाल्या. अनेक नाटक, सिनेमे सादर झाले. मालिकाही आल्या. प्रेक्षकांनी त्याला पसंतीही दाखवली. परंतु आजपर्यंत महाराष्ट्राचा जाणताराजा हरपल्याचे दृश्य कोणत्याच कलाकृतीत दाखवण्यात आलेले नाही. सध्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत हा प्रसंग दाखवण्यात येणार आहे.
 

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेला रसिक प्रेक्षाकांची चांगली पसंती मिळत आहे. आज घराघरात ही मालिका पाहिली जाते. या मालिकेत अभिनेता शंतनू मोघे याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिका साकारली आहे. तर अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांनी संभाजीराजांची भूमिका साकारली आहे. या मालिकेत शिवराय आणि शंभूराजे यांच्यातील वडील मुलाचे नाते दाखविण्यात आले. त्याला प्रेक्षकांनी भरभरून पसंती दिली. आता मात्र मालिकेतील या शिवपर्वाचा लवकरच शेवट होणार आहे. शिवाजी महाराजांच्या निर्वाणीचा प्रसंग मालिकेत कशाप्रकारे दाखवला जाणार? हे मालिकेचा येणारा भाग पाहिल्यावरच कळेल. महाराजांच्या निधनानंतर रायगडावरील राजकारणात काय बदल होणार? शंभूराजे या राजकारणाला आणि औरंगजेबाला कसे सामोरे जाणार? हा सारा इतिहास मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये उलगडण्यात येणार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/