औस्ट्रेलिया दौऱ्याची पराजयाने सुरुवात
महा एमटीबी   21-Nov-2018


 


ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ब्रिस्बेन येथे झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या उत्कंठावर्धक लढतीत ऑस्ट्रेलिया संघाने ४ धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाच्या या टी-२० मालिकेत यजमानांनी १-० अशी आघाडी मिळवली आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे २० षटकांचा सामना १७ षटकांमध्ये खेळवण्यात आला.

 

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने १७ षटकांत ४ बाद १५८ धावा केल्या. त्यानंतर पावसामुळे खेळ थांबवण्यात आला. बऱ्याच काळाने पाऊस थांबल्यानंतर भारतासमोर १७ षटकांमध्ये १७४ धावांचे लक्ष होते. भारताची सुरुवातच अडखळत झाली. रोहित शर्मा ७ धावांवर बाद झाला. त्यानंतर शिखर धवनशिवाय एकही फलंदाज जास्त वेळ तग धरू शकला नाही. शिखर धवनने १० चौकारांसह ४२ चेंडूंमध्ये १६ धावांची खेळी केली. कार्तिकने ३० धावा तर रिषभ पंतने २० धावा केल्या.

 

त्यापूर्वी ऑस्ट्रेलियाकडून खेळताना ग्लेन मॅक्सवेलने ४६ धावा केल्या. एरन फिंचने २७ धावा, ख्रिस लिनने ३७ धावा आणि स्टोनीसने ३३ धावा केल्या आहेत. भारताला शेवटच्या षटकामध्ये १३ धावांची गरज होती. कृणाल पंड्या आणि कार्तिकची विकेट पडल्यानंतर जिकंण्याच्या साऱ्या आशा संपुष्टात आल्या. भारताचा ४ धावांनी पराभव झाल्याने आता मालिका जिंकायची असेल तर भारताला पुढचे दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/