कशी ठरते तुम्ही पाहिलेल्या मालिकांची TRP?
महा एमटीबी   21-Nov-2018


 


आज २१ नोव्हेंबर म्हणजे World Television Day म्हणून पाळला जातो. जगभरात यानिमित्त युनाइटेड नेशनकडून लोकांमध्ये काय प्रसिद्ध आहे याचे परीक्षण केले जाते.

 

आपण नेहमीच ऐकतो की या मालिकेचा टीआरपी वाढला. त्या मालिकेचा टीआरपी कमी झाला. पण कधी विचार केला आहे का? की हा टीआरपी कसा मोजला जातो ते? कोणती मालिका सर्वाधिक लोकप्रीय आणि कुठला चॅनेल सर्वाधिक चालतो हे नेमके कसे ठरवले जाते?

 

 
 

चला तर मग पाहूया काही टीआरपी बद्दलच्या काही अश्या गोष्टी ज्या क्वचितच तुम्हाला माहित असतील.

 

- टीआरपी म्हणजे टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट. हे एक असे मोजणीचे यंत्र आहे ज्यामुळे एखादी मालिका अथवा चॅनेल किती लोकप्रिय आहे. किती लोक तो चॅनेल दिवसभर बघतात, किती लोकांना तो चॅनेल किंवा मालिका आवडते, इतर चॅनेल व मालिकांपेक्षा हे चॅनेल अथवा मालिका कसे जास्त लोकप्रिय आहेत हे सर्व जाणून घेण्यासाठी टीआरपीचा वापर केला जातो.

 

 
 

- टीआरपी मोजण्यासाठी काही ठराविक ठिकाणी “पीपल मीटर” लावले जातात. जे फ्रिक्वेन्सीच्या मदतीने कुठली मालिका बघितली जात आहे आणि किती वेळ बघितली जात आहे याचा तपास लावते.

 

 
 

- या मीटरमधील टीव्हीशी संबंधित सर्व माहिती इंडियन टेलिव्हिजन ऑडियन्स मेजरमेंटला पाठवली जाते. या माहितीनंतर मॉनिटरिंग टीम हे ठरवते की कोणत्या चॅनेलवरच्या कोणत्या कार्यक्रमाचा टीआरपी जास्त आहे.

 

 
 

टिआरपीला एवढे महत्व का?

  

- टीआरपी महत्वाचा असतो कारण एखाद्या चॅनेलची आर्थिक कमाई ही त्यावर अवलंबून असते.

 

 
 

- १० ते ३० सेकेंडच्या जाहिरातीला जास्त टीआरपीवाले चॅनेल करोडो रुपये आकारू शकतात. कारण त्या चॅनेलला viewership सगळ्यात अधिक असते.

 

- ज्या मालिकेला, कार्यक्रमाला किंवा चॅनेलला टीआरपी जास्त त्याकडे जाहिरातींचा ओघ हा सर्वाधिक असतो.

 

 
 

- ज्या चॅनेलची टीआरपी जास्त त्यांना जास्त जाहिरात मिळतात. प्राईम टाईमला तोच कार्यक्रम प्रसारित केला जातो, ज्याद्वारे चॅनेलला अधिक टीआरपी अर्थातच अधिक नफा मिळू शकेल. टीआरपी चॅनेलचा बिझनेसचा एक भाग असतो व यातूनच चॅनेल पैसा कमवत असते.

 

 
 

अशा प्रकारे हे टेलिव्हिजनच्या गणित चालते. त्यामुळे एखादी मालिका, कार्यक्रम किंवा चॅनेल का लोकप्रीय होतो याचा अंदाज तुम्हाला या प्रक्रियेवरून बांधता येईल.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/