दारू घरपोच दिल्याने वाईन शॉपला १९ लाखांचा दंड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Nov-2018
Total Views |

 

 
 
 
मुंबई : वांद्रे येथील पाली हिल येथे असलेल्या दीपक वाईन्स या दारू विक्रेत्याला तब्बल १९ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दीपक वाईन्स हे घाऊक दारू विक्रेत्याचे दुकान आहे. अबकारी विभागाने हा दंड ठोठावला. घरपोच दारू पोहोचविल्यामुळे या विक्रेत्यावर ही कारवाई करण्यात आली. योग्य परवाना नसतानाही हा विक्रेता घरपोच दारू पोहोचवत होता.
 
नोंदणी न केलेल्या कर्मचाऱ्यांकडून घरपोच दारू पोहोचवणे. तसेच विक्री केलेल्या दारूचा योग्य ताळेबंद न ठेवणे. असे आरोप या विक्रेत्यावर आहेत. २०१७ ते २०१८ या कालावधीत या विक्रेत्याने ११ लाख रुपये किंमतीची दारूविक्री केली. या विक्रीची त्याने नोंदणी केली नसल्याचे उघडकीस आले आहे. विक्रेत्याचा ताळेबंद तपासला असता असे लक्षात आले की या विक्रेत्याने नोंदणी ठेवता ६.३ लाख रुपयांची दारू विक्री केली. त्यामुळे या विक्रेत्याला १८.९ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. अशी माहिती अबकारी विभागाचे तपास अधिकारी सुभाष जाधव यांनी दिली.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@