वर्धा येथील लष्करी शस्त्रागारात स्फोट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Nov-2018
Total Views |

 


 
 
 
पुलगाव : वर्धामधील पुलगाव येथे असलेल्या लष्कराच्या शस्त्रागारात आज सकाळी भीषण स्फोट झाला. शस्त्रागारातील जुनी स्फोटके निकामी करताना हा स्फोट झाला असल्याचे समोर आले आहे. या भीषण स्फोटामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला असून १० जण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांमध्ये तेथील स्थानिक नागरिकांचाही समावेश आहे. जखमींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या स्फोटामुळे तेथील परिसरात हादरे बसले. त्यामुळे तेथील नागरिकांमध्ये सध्या भीतीदायक वातावरण आहे.
 
 

 
 

पुलगावमधील या शस्त्रागारातून भारतीय लष्कराला दारूगोळ्याचा पुरवठा केला जातो. या शस्त्रागाराजवळ ऑर्डिन्स फॅक्टरी आहेत. तेथे जुने झालेले बॉम्ब निकामी करण्यात येतात. जबलपूर ऑर्डिन्स फॅक्टरीतून काही कर्मचारी पुलगाव येथील शस्त्रागारात आले होते. या शस्त्रागारातील एक बॉम्ब निकामी करताना हा स्फोट झाला.

 

यापूर्वी २०१६ मध्ये पूलगावमधील याच शस्त्रगाराला आग लागली होती. त्यावेळी या परिसरात अशाचप्रकारचे मोठे हादरे बसले होते. सुमारे १५ किलोमीटर अंतरापर्यंत स्फोटाचे हादरे जाणवले होते. परंतु वेळीच आग लागलेल्या ठिकाणाहून दारूगोळा इतर ठिकाणी हलविण्यात आला होता. त्यामुळे खूप मोठा अनर्थ टळला होता.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@