हक्क आणि कर्तव्य नाण्याच्या दोन बाजू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Nov-2018
Total Views |

बाल हक्क परिषदेत पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे यांचे प्रतिपादन

 

जळगाव,
देश घडविण्यासाठी बालकांनी आपले हक्क, अधिकारांबाबत जागृत राहिले पाहिजे. बालक ही देशाची ऊर्जा असून हक्क जितके महत्त्वाचे तितकेच कर्तव्यही महत्त्वाचे आहे. कारण, हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे यांनी यावेळी मनोगत व्यक्त करतांना केले.
 
 
पोलीस अधीक्षक पुढे म्हणाले की, जागरूक आणि जबाबदार नागरिक ही काळाची गरज आहे, असे सांगून विकासाचा आणि जगण्याचा बालकांना अधिकार आहे.
 
 
परंतु बालकांनीही आपल्या हक्कांबाबत जागृत राहून आपले पालक आणि गुरुजनांचा आदर करावयास हवा. इंटरनेट, मोबाईल, टी.व्ही.चे व्यसन सोडून मुलांनी मैदानी खेळ खेळले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करीत त्यांनी केशवस्मृती प्रतिष्ठानच्या समतोल प्रकल्पाचेही कौतुक केले.
 
 
येथील केशवस्मृति प्रतिष्ठान संचालित समतोल प्रकल्प आणि जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कांताई सभागृहात मंगळवार, 20 रोजी सकाळी 10 वा. जागतिक बालहक्क दिनानिमित्त आयोजित परिषदेत बालकामगार, बालविवाह, लैंगिक शोषण, बालकांचे हक्क व अधिकार तसेच बाल संरक्षणासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यासंदर्भातील सनद बालकांनी मान्यवरांना सुपूर्द केली.
 
 
व्यासपीठावर केशवस्मृती सेवासंस्था समूहाचे प्रमुख भरतदादा अमळकर, पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे, समतोलचे प्रकल्पप्रमुख दिलीप चोपडा, महिला व बालविकास अधिकारी रमेश काटकर, महिला बालकल्याण समितीच्या अध्यक्षा वैजयंती तळेले होते.
 
 
 
परिषदेसाठी शहरातील विविध शाळेतील विद्यार्थी आपल्या शाळेतून रॅलीने कांताई सभागृहात आले. प्रारंभी लोककला कलावंत विनोद ढगे आणि सहकार्‍यांनी ‘जनजागृतीची दिंडी आली गावात’ हे पथनाट्य सादर केले.
 
 
त्यातून बाल हक्क आणि अधिकारांबाबत जनजागृती करण्यात आली. पथनाट्यात उपस्थित बालकांनीही सहभाग नोंदविला. बालसुधारगृहातील मुलांनी स्वागतगीत सादर केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली.
प्रास्ताविकात डॉ. शैलजा चव्हाण यांनी जागतिक बालहक्क परिषदेच्या आयोजनाची माहिती दिली. 25 राज्यातील 1 हजार 79 मुलांचे पुनर्वसन करण्यात आल्याचे सांगून त्यांनी समतोल प्रकल्पाच्या कार्याचीही माहिती दिली.
 
 
त्याचबरोबर चाईल्ड लाईनविषयीसुद्धा उपस्थितांना कल्पना दिली. संस्कृती पवनीकर आणि प्रत्यय झारे या बालकांनी मनोगत व्यक्त केले. बालसुधार गृहाच्या अध्यक्षा जयश्री पाटील यांनी बालहक्क सनदचे वाचन केले.
 
 
समतोल प्रकल्पाच्या व्यवस्थापिका सपना श्रीवास्तव यांनी विद्यार्थी प्रतिनिधींसह ही सनद मान्यवरांना सुपूर्द केली. सूत्रसंचालन श्रावणी पाठक आणि अनादी जोशी या बालिकांनी केले.
@@AUTHORINFO_V1@@