मोदी सरकारचे या १२९ शहरांना गिफ्ट !!!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Nov-2018
Total Views |
 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील १२९ शहरातील नागरिकांसाठी २२ नोव्हेंबर रोजी मोठी घोषणा करणार आहेत. देशातील प्रमुख राज्यांतर्गत थेट पाईपलाईनद्वारे गॅस जोडणीसाठीच्या योजनांचे भूमीपूजन करणार आहेत. दिल्लीतील विज्ञान भवनात हा कार्यक्रम घेतला जाणार आहे.

 

देशभरात गॅस जोडणीचे जाळे विस्तारण्याची महत्वकांशी योजना केंद्र सरकार आखत आहे. यात प्रामुख्याने महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कौशाम्बी, इटावा, मेरठ, हरियाणा, सोनीपत, पंजाब, हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, गुजरात, कर्नाटक आदी राज्यांचा सामावेश आहे.

 

पंतप्रधान उज्वला योजनेच्या यशानंतर आता देशातील प्रत्येक घरांमध्ये थेट गॅस कनेक्शन देण्याचा सरकारचा विचार आहे. यात प्रमुख सरकारी गॅस कंपन्यांचाही सहभाग असणार आहे. या योजनेतील इतर महत्वाची माहीती २२ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमात दिली जाईल. महाराष्ट्रामध्ये नगर, औरंगाबाद, धुळे, नाशिक, उस्मानाबाद, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आदी शहरांचाही यात सामावेश आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@