अंजली दमानियांविरोधातील गुन्हा रद्द

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Nov-2018
Total Views |

आ.एकनाथराव खडसे सर्वोच्च न्यायालयात जाणार

 
 
औरंगाबाद
 
उच्च न्यायालयाने भाजपाचे ज्येष्ठ नेते आ.एकनाथराव खडसे यांच्या तक्रारीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याविरुद्ध दाखल केलेला गुन्हा रद्द केला आहे. दरम्यान, दमानिया यांच्याविरोधात दाखल झालेला गुन्हा रद्द होण्याची ही दुसरी वेळ आहे.
 
अंजली दमानिया व इतर पाच जणांनी आ.खडसेंविरोधात आर्थिक गैरव्यवहार केल्याबद्दल डिसेंबर 2016 मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
 
त्यात एका राष्ट्रीयीकृत बँकेचा 9.5 कोटींचा, तर एका सहकारी बँकेचा 10 लाख रुपयांच्या दोन डिमांड ड्राफ्टच्या (डीडी) प्रती सादर केल्या होत्या. याप्रकरणी गडबड करून खोटी कागदपत्रे सादर केल्याची तक्रार त्यांनी मुक्ताईनगर पोलिसांत केली होती.
 
त्यानुसार पोलिसांनी अंजली दमानिया व अन्य पाच जणांवर 13 जून 2018 रोजी गुन्हा दाखल केला होता. मे 2018 रोजी अंजली दमानिया यांनी पुणे लाचलुचपत विभागाने खडसेंना दिलेल्या क्लीन चिटविरोधात अपील केले आहे.
 
औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायमूर्ती नलावडे आणि न्यायमूर्ती विभा कंकनवाडी यांच्यासमोर सुनावणी झाली.यावेळी अंजली दमानिया यांनी स्वतः युक्तिवाद केला. दरम्यान, आपण अंजली दमानिया यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची प्रतिक्रिया आ.एकनाथराव खडसे यांनी दिली.
@@AUTHORINFO_V1@@