शाहरुखकडून चाहत्यांना 'झिरो'चे रिटर्न गिफ्ट
महा एमटीबी   02-Nov-2018


 


 

मुंबई: बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा ५३वा वाढदिवस. त्यानिमित्ताने त्याच्या बहुचर्चित 'झिरो' या त्याच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. कमी वेळात या ट्रेलरला चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंतच्या केलेल्या त्याच्या भूमिकांपेक्षा त्याच्या या भूमिकेचा वेगळाच अंदाज पाहायला मिळाला. या ट्रेलरनिमित्त त्याने आपल्या चाहत्यांना जणू रिटर्न गिफ्टच दिले आहे.

 

'झिरो' या चित्रपटात तो बाउआ सिंगची भूमिका साकारत असून तो बुटका दाखवण्यात आला आहे. त्रेलोरच्या सुरुवातीला शारूखची एन्ट्री अगदी धुवाँधार आहे. लग्नासाठी बाउआ मुलगी शोधत असतो. अनुष्काचा फोटो पाहूनच तिच्या तो प्रेमात पडतो. पण तिला पाहिल्यानंतर तिला अंपगत्व असल्याचे त्याला कळते. तरीही तो तिच्या प्रेमात पडतो. या दोघांची ही आगळीवेगळी प्रेमकथा आणि त्यामध्ये सुपरस्टार दाखवली जाणारी कतरिनाच्या ट्विस्ट या चित्रपटात मांडण्यात आलेला आहे, असा अंदाज या ट्रेलरवरून येतो. या संपूर्ण ट्रेलरमध्ये शाहरुख खानवर घेतलेली मेहनत कमालीची वाटते. त्याचसोबत अनुष्काचीही भूमिका तिच्या इतर भूमिकेपेक्षा वेगळी वाटते.

 
 
 

आनंद एल राय दिग्दर्शित 'झिरो' हा सिनेमा २१ डिसेंबर २०१८ ला प्रदर्शित होणार आहे. याचे संगीत अजय अतुल यांनी केले आहे. या चित्रपटाची घोषणा केल्यापासून शाहरुखच्या लूकची चर्चा सगळीकडेच होती. आत या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/