विठू माऊलीच्या चरणी अक्षयही नतमस्तक!
महा एमटीबी   19-Nov-2018 
 
मुंबई : आज कार्तिकी एकादशीच्या शुभमुहूर्तावर ‘माझी पंढरीची माय’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. अभिनेता रितेश देशमुख याच्या ‘माऊली’ या आगामी सिनेमातील हे गाणे आहे. रितेशने आज ट्विट करून या सिनेमातील हे पहिले गाणे प्रदर्शित केले. आषाढी एकादशीनिमित्त ‘माऊली’ या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. हे पोस्टर अभिनेता शाहरुख खानने शेअर केले होते. आता ‘माझी पंढरीची माय’ हे गाणे अभिनेता अक्षयकुमारने शेअर केले आहे. 
 
 
 
 

हे गाणे मला प्रचंड आवडले आहे, तुम्हालाही नक्की आवडेलअसे कॅप्शन अक्षयने लिहिले आहे. येत्या १४ डिसेंबर रोजी माऊली हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. अजय-अतुल या जोडीने माऊली हा सिनेमा संगीतबद्ध केला आहे. आदित्य सरपोतदार यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/