सेन्सेक्स ३१७, निफ्टी ८१ अंशानी वधारले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Nov-2018
Total Views |

 

मुंबई : आशियाई बाजारातील निर्देशांकांच्या तेजीचे पडसाद भारतीय निर्देशांकांवरही उमटले. सोमवारी दोन्ही निर्देशांक वधारुन बंद झाले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३१७ तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८१ अंशांनी वधारला. सेन्सेक्स ३५ हजार ७७५ अंशांवर तर निफ्टी १० हजार ७६३ च्या स्तरावर बंद झाला.
 

मुंबई शेअर बाजारात येस बॅंक, आयटीसी, टाटा मोटार्स, इंडसइंड बॅंक आणि वेदांता वधारले तर ओएनजीसी, आयसीआयसीआय बॅंक, एसबीआय, एनटीपीसी, एशियन पेंट्स आदी शेअर्समध्ये घसरण नोंदवण्यात आली. निफ्टीमध्ये येस बॅंक, आयटीसी, टाटा मोटर्स, इंडसइंड, सन फार्मा आदी शेअर वधारले तर इंडियाबुल्स हाऊसिंग, गेल, बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बॅंक, ओएनजीसी आदींची घसरण झाली. आठवड्याच्या सुरुवातीला गुंतवणूकदारांनी ऑटोमोबाईल, रियल्टी, कन्झ्युमर प्रोडक्ट, एनर्जी, आयटी, मेटल आणि फार्मा आदी क्षेत्रात केलेल्या खरेदीमुळे दोन्ही निर्देशांकांमध्ये तेजी दिसून आली. निफ्टीच्या मंचावर इंडिया बुल्स फायनान्सच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. .४२ टक्क्यांच्या घसरणीसह शेअर ७४० रुपयांवर बंद झाला. सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांवर दबाव दिसून आला. निफ्टी ऑटो, फार्मा, आयटी, रियल्टी क्षेत्रातील शेअर वधारुन बंद झाले.

 

जेट एअरवेजचा शेअर टक्क्यांनी घसरला

 

१२ टक्क्यांच्या घसरणीसह उघडलेला जेट एअरवेजचा शेअर दिवसअखेर सावरत .८८ टक्क्यांच्या घसरणीसह ३२३ रुपयांवर बंद झाला. रविवारी कंपनीने एकूण १० उड्डाणे रद्द केली होती, त्याचे पडसाद सोमवारी बाजारात उमटले. टाटा सन्सतर्फे खरेदी करण्याच्या वृत्तामुळे हा शेअर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@