‘या’ प्रश्नाने महानायक झाले निरुत्तर!
महा एमटीबी   19-Nov-2018

 


 
 
 
मुंबई : अमिताभ बच्चन यांची नात आराध्या हिचा वाढदिवस नुकताच साजरा झाला. या वाढदिवसाला अनेक बॉलिवुड सेलिब्रिटींची मुले आली होती. शाहरुख खान याचा मुलगा अबराम याने देखील या बर्थडे पार्टीला हजेरी लावली. नातीचा वाढदिवस म्हटल्यावर बिग बी देखील या पार्टीला उपस्थित होते. गंमत म्हणजे लहानग्या अबरामने अमिताभ यांना एक निरागस प्रश्न विचारला. या प्रश्नावर चक्क महानायकही निरुत्तर झाले.
 

“आजोबा आमच्यासोबत का राहत नाही?” हा होता,तो निरागस प्रश्न! जो अबरामने अमिताभ यांना पार्टीत हात मिळविताना विचारला. अमिताभ आणि शाहरुख खान यांनी आजवर अनेक सिनेमांमध्ये बापबेट्याची भूमिका साकारली आहे. त्यामुळे अमिताभ हे प्रत्यक्षात शाहरुख खान यांचे वडील आहेत असा अबरामचा समज झाला आहे. अमिताभ हे आपले आजोबा आहेत. हे अबराम मानत असून ते आपल्यासोबत का राहत नाहीत? असा निरागस प्रश्न त्याला पडला आहे. तो त्याने अमिताभ यांना या पार्टीत विचारला देखील. अमिताभ यांना खरेच या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. परंतु पार्टीतील हा किस्सा अमिताभ यांनी आपल्या अधिकृत इनस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला.

 

 
 

हा किस्सा शेअर करताना अमिताभ यांनी अबरामसोबत हात मिळवतानाचा फोटोही शेअर केला आहे. अमिताभ बच्चन यांच्या या पोस्टवर सध्या सोशल मीडियावर भरपूर प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. माझ्या बालपणी मलादेखील अमिताभ हे शाहरुख खान यांचे वडीलच वाटायचे. कारण अनेक सिनेमांमध्ये दोघांनी एकत्र काम केले आहे.असे अमिताभ यांच्या एका चाहत्याने या पोस्टवर म्हटले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/