शाहरुख खान हा एअर इंडियाचा ‘स्वयंघोषित सदिच्छादूत’
महा एमटीबी   19-Nov-2018 
 
 
मुंबई : बॉलिवुडचा बादशाह शाहरुख खान याने एअर इंडियाच्या सेवेवर खूश होऊन ट्विटरवरून एअर इंडियाला कौतुकाची थाप दिली आहे. इतकेच नव्हे तर शाहरुख खानने स्वत:ला एअर इंडियाचा ‘स्वयंघोषित सदिच्छादूत’ जाहीर केले आहे. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी माझे आदरातिथ्य केले. या आदरातिथ्याने त्यांनी माझे मन जिंकले आहे. असे शाहरुखने ट्विट केले.
 
 
 
 

शाहरुखच्या या ट्विटवर एअर इंडियाने आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘बादशाह’चा पाहुणचार करायला ‘महाराजा’ला आवडेल. असे एअर इंडियाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केले आहे. शाहरुखच्या ट्विटमुळे आम्हाला काम करण्यासाठी अधिक प्रेरणा मिळाली आहे. शाहरुख खान जर आमचा सदिच्छादूत झाला तर आम्हालाही ते आवडेल. असे एअर इंडियाने म्हटले आहे.

 
 
 
 
 

वैमानिकापासून ते या विमानसेवेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याने आपल्या कामाने आणि मला दिलेल्या सेवेमुळे माझे मन जिंकले आहे. मी स्वत:ला आता या कंपनीचा स्वयंघोषित सदिच्छादूत जाहीर करतो. महाराजा हा महाराजाच असतो.” असे ट्विट शाहरुखने केले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/