…अन्यथा ‘एसबीआय नेट बॅंकींग’ बंद !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Nov-2018
Total Views |
 

मुंबई : स्टेट बॅंक ऑफ इंडियाने त्याच्या इंटरनेट बॅंकींग युझर्ससाठी महत्वपूर्ण घोषणा केली. खातेधारकांनी त्यांचा मोबाईल क्रमांक बॅंकेकडे नोंदणी करायचा आहे. ३० नोव्हेंबरपूर्वी मोबाईल क्रमांकाची नोंदणी झाल्यास ग्राहकांची नेट बॅंकींग सुविधा बंद केली जाईल. त्यामुळे तातडीने बॅंकेच्या शाखेत मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याचे आवाहन एसबीआयने खातेधारकांना केले आहे.

 
रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार, इंटरनेट बॅंकींग आणि मोबाईल बॅंकींग सेवा वापरणाऱ्या ग्राहकांना मोबाईल क्रमांक नोंदवणे बंधनकारक आहे. या प्रकरणी एसबीआयच्या संकेतस्थळावर माहीती दिली. रिझर्व्ह बॅंकेने जुलै २०१७मध्ये काढलेल्या परिपत्रकानुसार, बॅंक खात्यातील कोणत्याही व्यवहाराबद्दल ग्राहकाला तातडीने एसएमएस जाणे गरजेचे असून ग्राहकांना मोबाईल क्रमांक नोंदवण्याचे आवाहन सर्वच बॅंकांद्वारे करण्यात आले आहे.
 

मोबाईल क्रमांक अपडेटची अशी करा पडताळणी

 

तुम्ही एसबीआय खातेधारक असाल तर ऑनलाईन बॅंकींग संकेतस्थळावर लॉग इन करा, त्यानंतर माय अकाऊंट प्रोफाईलमध्ये जा. तुमचा लॉगइन पासवर्ड नोंदवल्यानंतर मोबाईल क्रमांकाच्या रकान्यात तुमचा मोबाईल दिसेल, जर दिसत नसेल तर बॅंकेच्या जवळ्च्या शाखेत जाऊन तुम्ही तो अपडेट करू शकता.

 

एटीएममध्ये करा मोबाईल क्रमांक अपडेट

 

एटीएममध्ये गेल्यानंतर डेबिट कार्ड स्वाईप केल्यानंतर पिन टाका, मोबाईल रजिस्ट्रेशन पर्याय निवडा, त्यात मोबाईल क्रमांक टाका आणि पडताळणीसाठी पुन्हा क्रमांक नोंदवा. त्यानंतर स्क्रीनवर मोबाईल क्रमांक अपडेट झाल्याचा संदेश दिसेल. त्यानंतर एसबीआयचा प्रतिनिधी तुम्हाला दोन दिवसांत संपर्क करतील, त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक अपडेट होईल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@