-४ डिग्री सेल्सिअस तापमानात झाले मराठी सिनेमाचे चित्रिकरण
महा एमटीबी   19-Nov-2018

 


 
 
 
युरोप : मराठी सिनेमा हा काळानुरुप बदलत चालला आहे. मराठी सिनेमांचे चित्रिकरणही आता परदेशात होऊ लागले आहे. ‘आरॉन’ या मराठी सिनेमाचे चित्रिकरण हे फ्रान्समधील पॅरिस येथे झाले आहे. विशेष म्हणजे पॅरिससारख्या थंड हवेच्या ठिकाणी हे चित्रिकरण करण्यात आले. चित्रिकरणाच्यावेळी तेथे तब्बल उणे ४ डिग्री (-४) सेल्सिअस असे हवामान होते. अशा अत्यंत थंड वातावरणात या सिनेमाच्या कलाकारांनी तग धरून हे चित्रिकरण पूर्ण केले. याबद्दल या कलाकारांचे खरोखरच कौतुक व्हायला हवे.
 
 
 
 

दिवसेंदिवस अनेक मराठी कलाकार अशी वेगवेगळी आव्हाने स्वीकारत आहेत. त्यामुळे मराठी सिनेमा एका वेगळ्या उंचीवर नेण्यास मदत होत आहे. आरॉन सिनेमाच्या चित्रिकरणाच्या टीममध्ये बहुतांश तंत्रज्ञ हे फ्रेंच होते. तसेच हे तंत्रज्ञ फ्रान्समधील रहिवासी होते. त्यामुळे त्यांना तेथील हवामानाची सवय होती. परंतु त्यांमानाने सिनेमातील मराठी कलाकारांनी ही बोचणारी थंडी सहन केली. शशांक केतकर, नेहा जोशी या मराठी कलाकारांच्या ‘आरॉन’मध्ये प्रमुख भूमिका आहेत. ‘आरॉन’ या सिनेमाच्या निमित्ताने अनेक देशांतील लोक एकमेकांशी जोडले गेले आहेत. येत्या ७ डिसेंबर रोजी ‘आरॉन’ हा सिनेमा भारतात सर्वत्र प्रदर्शित होतोय.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/