जस्टिन बिबरने दिली लग्नाची कबूली!
महा एमटीबी   17-Nov-2018


 
  
न्यूयॉर्क : आंतरराष्ट्रीय पॉप स्टार जस्टिन बिबर याने नुकतीच सोशल मीडियावर आपल्या लग्नाची कबूली दिली आहे. दोन महिन्यांपूर्वी जस्टिन बिबरने अमेरिकन मॉडेल हॅले बाल्डविन हिच्याशी लग्न केले. या दोघांनी गुपचूप लग्न उरकल्याची सगळीकडे चर्चा रंगली होती. या चर्चेला पूर्णविराम देत जस्टिनने आपल्या लग्नाची कबूली सोशल मीडियावर दिली आहे.
 
 

 
 

जस्टिनने इन्स्टाग्रामवर हॅलेसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. ‘माय वाईफ इज ऑसम’ असे कॅप्शन जस्टिनने या फोटोला दिले आहे. या फोटोत हॅलेने जस्टिनचा हात धरला आहे. दोघांच्याही चेहऱ्यावर स्मित हास्य दिसत आहे. दोन महिन्यांपूर्वी या दोघांनी गुपचूप कोर्टमॅरेज केले होते. बहामा आयलँडवर जस्टिनने हॅलेला लग्नाची मागणी घातली होती. त्यावर हॅलेने जस्टिनला होकार दिला. तेव्हापासून हॅले आणि जस्टिनची जोडी ही सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

 
    माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/