‘आफ्रिदी काय चुकीच म्हणाला ?’
महा एमटीबी   15-Nov-2018
 
 

नवी दिल्ली : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानबाबत केलेल्या वक्तव्यावर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी प्रतिक्रीया दिली आहे. यावर चिमटा काढत काश्मिरसाठी कुरापती करणाऱ्या पाकिस्तानला चांगलेच सुनावले आहे. दरम्यान, आफ्रिदी त्याच्या वक्तव्यामुळे पाकिस्तानात सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल झाला आहे.

 

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना घरचा अहेर दिला होता. पाकिस्तानला त्यांचे घर सांभाळता येत नाही, देश सांभाळता येत नाही काश्मिर काय सांभाळणार?, आम्हाला काश्मिर नको आहे, असे म्हणत कर्जात बुडालेल्या पाकिस्तानवर प्रतिक्रिया देताना त्याने नेत्यांना लक्ष्य केले होते. यावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी शाहिद आफ्रिदीच्या या वक्तव्याला दुजोरा दिला.

 

ते म्हणाले, आफ्रिदीचे म्हणणे बरोबर आहे. त्यांना पाकिस्तान सांभाळता येत नाही, देश काय सांभाळणार. काश्मिर हा देशाचा हिस्सा आहे आणि कायम राहील.लंडनमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शाहिद आफ्रिदीने संबंधित वक्तव्य केले होते. त्याचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला. पाक व्याप्त काश्मिरबद्दल बोलताना तो म्हणाला कि आम्हाला काश्मिर नको आहे, तो भारतालाही देऊ नये तेथील लोकांना दहशतवाद्यांच्या कारवायांपासून मुक्त करायला हवे जेणेकरून ते शांततेत जगू शकतील. मात्र, नेटकऱ्यांनी या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आणि शाहिद आफ्रिदी ट्रोल झाला.

 
  

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/