सरकारी कार्यालयांमध्ये संघ शाखा भरवू !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Nov-2018
Total Views |
 

भोपाळमध्यप्रदेशात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून रा. स्व. संघाच्या शाखांवरून कॉंग्रेसने भाजपला लक्ष्य केले. सत्तेत आल्यास सरकारी ठिकाणी शाखांवर बंदी घालू, असे वचन कॉंग्रेसने जाहीरनाम्यातून दिले. यावरून मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी काँग्रेसला चोख प्रत्युत्तर दिले. यावेळी संघाच्या शाखा सरकारी कार्यालयातही भरवल्या जातील, केवळ सरकारी कर्मचारीच नव्हे तर प्रत्येक देशभक्त रा.स्व. संघाच्या शाखेत सहभागी होऊ शकतो, असे ते म्हणाले.  

 
 
मध्यप्रदेशात सत्तांतर झाल्यास सरकारी जागांवर भरणाऱ्या संघाच्या शाखांवर बंदी घालू, असा वचननामा काँग्रेसने जाहीर केला आहे. त्यावरून शिवराज सिंह यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. संघाच्या शाखा सरकारी कार्यालयांमध्येही भरतील आणि ज्या सरकारी कर्मचाऱ्यांची इच्छा असेल तेही शाखांमध्ये सहभागी होतील. यावर कोणीही बंदी आणू शकत नाही, असे खडेबोल त्यांनी कॉंग्रेसला सुनावले आहे. खरगोनमध्ये घेण्यात आलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. 
 
 
खरगोन जिल्ह्यातील एका प्रचारसभेत शिवराज सिंह यांनी सोमवारी भाषण केले. त्यावेळी त्यांना पत्रकारांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याबद्दल आणि त्यातील शाखांवरील बंदीच्या आश्वासनाबद्दल प्रश्न विचारला. यावेळी सरकारी कार्यालयांमध्येही शाखा भरतील, असे उत्तर त्यांनी दिले. 'केवळ सरकारी कर्मचारीच नाही, तर प्रत्येक देशभक्त शाखेत जाऊ शकतो. कारण संघ ही देशभक्तांची संघटना आहे,' असे सिंह यांनी सांगितले. 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@