रा.स्व.संघाबद्दल कॉंग्रेस आमदाराची मुक्ताफळे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Nov-2018
Total Views |
 
 

भोपाळ : मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारादरम्यान कॉंग्रेसच्या नेते मंडळींची एकाहून एक बेताल वक्तव्ये पुढे येत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी वादग्रस्त विधान केले असताना आता त्यांच्याच पक्षाच्या एका आमदाराने मुक्ताफळे उधळली आहेत.

  

कॉंग्रेस आमदार सुंदरलाल तिवारी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. रा.स्व.संघ हे दहशतवादाचे प्रतिक असल्याचे वादग्रस्त विधान तिवारी यांनी केले आहे. यामुळे कॉंग्रेसचे नेते चांगलेच अडचणीत येणार आहेत. रिवा जिल्ह्यातील गुढ मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारे आमदार सुंदरलाल तिवारी यांची रा.स्व.संघावर टीका करताना जीभ घसरली आणि त्यांनी गांधी हत्येशीही संघाचा संबंध जोडला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा लोकांच्या भावना भडकवण्याचे काम करत असून गांधींची हत्या रा.स्व.संघाने केल्याचे बेताल वक्तव्यही त्यांनी केले आहे. दरम्यान, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधीही अशा वक्तव्यांमुळे अडचणीत आले होते.

 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर मानहानीचा दावा ठोकण्यात आला आहे. भिवंडीच्या सत्र न्यायालयात या प्रकरणी रा.स्व.सेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी याचिका दाखल केली होती. दरम्यान तिवारी या विधानामुळे अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@