हॅपी बर्थडे! ऐश्वर्या
महा एमटीबी   01-Nov-2018

 


 
 
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिचा आज वाढदिवस! विश्वसुंदरी ते एक यशस्वी बॉलिवुड अभिनेत्री असा प्रवास ऐश्वर्याने केला. हा ऐश्वर्याचा हा ४५ वा वाढदिवस आहे.परंतु सौंदर्याला वय नसते, हे ऐश्वर्याकडे पाहून कळते.
 

सुंदर डोळे, कमनीय बांधा, गोरा वर्ण अशा आपल्या मनमोहक रूपाने तिने चाहत्यांना भुरळ पाडली. आपल्या आकर्षक रूपाने ऐश्वर्याने विश्वसुंदरी हा किताब तर जिंकलाच पण आपल्या अभिनय कौशल्याने ताकदीवर ऐश्वर्याने जग जिंकले.

 

 
 
लंडन मधील मादम तुसाँद संग्रहालयात ऐश्वर्याचा मेणाचा पुतळा पाहण्यास अनेकांची गर्दी जमते. ऐश्वर्यांने हॉलिवुडपटांमध्येही उल्लेखनीय काम केले आहे.
 
 

 
 

ही विश्व सुंदरी कोणाच्या गळ्यात वरमाला घालणार? अशी चर्चा तिच्या लग्नाच्या वेळी रंगली होती. ऐश्वर्याने मात्र अभिनेता अभिषेक बच्चन यांची आयुष्याचा जोडीदार म्हणून निवड केली आणि ती बच्चन घराण्याची सून झाली. पुढे मुलगी आराध्याच्या जन्मानंतरही तिने सिनेमांमधून काम सुरू ठेवले.

 

 
 
 
काळ बदलला बॉलिवुडमध्ये अनेक नवोदित अभिनेत्रीही आल्या. पण रसिकांवरील मनातील ऐश्वर्याची जादू काही संपत नाही. आजही सौदंर्याचे दाखले द्यायचे झाले तर ऐश्वर्याचे नाव अग्रस्थानी असते.
 
 

 
 
 
 
 - साईली भाटकर

 

 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/