माझ्या प्रकृतीविषयी नको ते तर्क लावू नका : ऋषी कपूर
महा एमटीबी   09-Oct-2018

 


 
 
 
मुंबई : काही दिवसांपूर्वी बॉलिवुड अभिनेते ऋषी कपूर यांना कॅन्सर झाल्याची अफवा पसरली होती. तसेच ऋषी कपूर हे कॅन्सरवरील उपचारांसाठी न्यूयॉर्कला गेले असल्याचीही चर्चा सिनेवर्तुळात रंगली होती. या सर्व चर्चांना पूर्णविराम देत ऋषी कपूर यांनी त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे ट्विटरवरून आपल्या चाहत्यांना कळविले. तसेच ऋषी कपूर हे न्यूयॉर्कमध्ये वैद्यकीय उपचार घेत असून त्यांच्या प्रकृतीविषयी नको ते तर्कवितर्क लावू नयेत. असा सल्ला देखील त्यांनी आपल्या चाहत्यांना दिला. “गेली ४५ वर्षे माझ्या शरीराने खूप काही सोसले आहे. तुमचे प्रेम माझ्यावर असेच राहो. मी लवकरच परत येईन.” असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले.
 
 
 
 

अभिनेते अनुपम खेर यांनी काल आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला होता. अनुपम खेर आणि ऋषी कपूर हे या व्हिडिओत न्यूयॉर्कमधील मॅनहॅटनच्या रस्त्यावर एकत्र चालताना दिसत आहेत. ऋषी कपूर यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला. 'खेर फ्री किंवा केअर फ्री न्यूयॉर्कमधील मॅनहॅटनच्या रस्त्यांवर अनुपम खेर यांच्यासोबत' असे कॅप्शनही दिले आहे.

 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/