आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप
महा एमटीबी   09-Oct-2018

 


 
 
 
मुंबई : #Metoo या मोहिमेअंतर्गत जगभारतील स्त्रिया एकापाठोपाठ एक त्यांच्यासोबतही लैंगिक गैरवर्तन झाल्याचा उलगडा करताना दिसत आहेत. या प्रकारात बॉलिवुडमधील आणखी एका दिग्गज अभिनेत्याचे नाव समोर आले आहे. बॉलिवुडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक,लेखिका व निर्मात्या विनता नंदा यांनी बॉलिवुड अभिनेते आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे.
  
 
 

१९९३ मधील सुप्रसिद्ध 'तारा' मालिकेच्या निमित्ताने आलोकनाथ आणि विनता हे एकत्र काम करत होते. विनता यांनी या मालिकेचे लेखन केले होते. आलोकनाथ हे या मालिकेत प्रमुख भूमिकेत होते. एका फेसबुक पोस्टद्वारे विनता यांनी हा आलोकनाथ यांच्यावर हा आरोप केला आहे. आलोकनाथ यांनी हा आरोप फेटाळला असून “बलात्कार झाला असेल, पण मी तो केलेला नाही. सध्या अशा प्रकरणांमध्ये फक्त महिलांचीच बाजू घेतली जाते पुरुषांची बाजू कोणी ऐकतच नाही. त्यामुळे मी काहीच बोलणार नाही.” असे आलोकनाथ यांनी म्हटले.‘तारा’ या मालिकेतील मुख्य अभिनेत्री नवनीत निशाण यांनी याप्रकरणी विनता नंदाला पाठिंबा दिला. याप्रकरणी सिंटा आलोकनाथ यांना नोटीस पाठविण्याच्या तयारीत आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/