युथ ऑलिम्पिक २०१८: १५ वर्षीय जेरेमीला सुवर्ण पदक
महा एमटीबी   09-Oct-2018

 
 
 
अर्जेटिना: १५ वर्षाच्या जेरेमी लाल लालरिनुंगाने वेटलिफ्टिंग मध्ये सुवर्ण पदक मिळवून नवा विक्रम केला. याने ६२ किलो वजनी गटामध्ये हा पराक्रम केला. युवा जेरेमीने एकूण २७४ किलो वजन उचलले. दुसऱ्या स्थानावर असलेल्या तुर्कीच्या टॉपटस कानेरने २६३ किलो तर तिसऱ्या स्थानावरील कोलंबियाच्या विलर एस्टिवनने २६० किलो वजन उचललेयापूर्वी वर्ल्ड युथ स्पर्धेत जेरमीला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते. 
 
भारतीय नेमबाज मेहूली घोष हिने युथ ऑलिम्पिक २०१८मध्ये रौप्य पदकाची कमाई केली आहे. १० मीटर एअर रायफल प्रकारामध्ये रौप्य पदक कमावले आहे. तिचे सुवर्ण पदक थोडक्यात हुकले. याच सोबत भारताच्या खात्यात आता ३ रौप्य तर एक सुवर्ण पदके जमा आहेत. शेवटच्या फेरीची सुरुवात मेहूलीने चांगली केली होती. तिच्या शेवटच्या नेममध्ये ९.१ गन पटकावला. यामुळे थोड्याच अंतराने तिचे सुवर्णचे स्वप्न भंगले. तिच्या एकूण गुणांची बेरीज ही २४८.० इतकी झाली. डेन्मार्कच्या स्टेफनीने २४८.७ गन मिळवत सुवर्ण पदक मिळवले. अवघ्या ०.७ या फरकाने तिचे सुवर्ण पदक हुकले. 
 
तुषार माने याने पुरुषांच्या १० मीटर एअर राफेल प्रकारात रौप्य पदकाची कमाई केली. तर टीबाबा देवी हिने जुडो प्रकारात रौप्य पदकाची कमाई केली. या दरम्यान हॉकीमध्ये भारतीय महिला संघाने सलग दुसरा विजय मिळवला. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रियाला धूळ चारत दुसऱ्या सामन्यात त्यांनी उरुग्वेचा २-१ असा पराभव केला.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/