नव्या सँन्ट्रोची बुकींग सुरू
महा एमटीबी   09-Oct-2018
 


 चेन्नई : कोरियन कार निर्मिती कंपनी ह्युंडाईने वीस वर्षांपूर्वी बाजारात आणलेल्या सँन्ट्रो कारच्या नव्या आवृत्तीची घोषणा केली आहे. याच महिन्यात नव्या कारचे अनावरण करणार असल्याची घोषणा कंपनीने केली आहे. ह्युंदाईने केलेल्या सर्वेक्षणानुसार सँन्ट्रो हे भारतातील सर्वात लोकप्रिय नाव ठरले आहे. यामुळेच नवे उत्पादन एएच-२चे नावच सँन्ट्रो ठेवले आहे.
 
 

 

 

गेल्या काहीकाळापासून ह्युंडाईचे ग्राहक सँन्ट्रोच्या प्रतिक्षेत होते. या नव्या कारमध्ये १.१ लीटर इंजिन, फाईव्ह स्पीड मॅन्युअल गीअर बॉक्ससह अन्य अद्यावत सुविधा देण्यात आल्या आहेत. ह्युडाईने सँन्ट्रोचे पेट्रोल इंजिनही विकसित केले आहे. भारतात ह्युंदाईचा ग्राहकवर्ग मोठा असल्याने येत्या काळात कारला प्रचंड मागणी असेल असा विश्वास कंपनीला आहे. कारची किंमत आकर्षक असून मारुती व्हॅगनार आणि टाटा ट्रिगो यांना टक्कर देणारी असेल. या कारचे २३ ऑक्टोबरला अधिकृतरीत्या अनावरण केले जाणार असून नवी दिल्ली येथे मेक इन इंडिया कार्यक्रमाअंतर्गत विकसित केली जाणार आहे. 
 

 
 
 
सँन्ट्रो इंडियाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय कुटूंबांच्या गरजेप्रमाणे या कारची निर्मिती करण्यात आली आहे. जुन्या कारच्या तुलनेत आतील जागा वाढवण्यात येणार असून दोन चाकांमधील अंतरही वाढवण्यात येणार आहे. याशिवाय कारमध्ये सात इंचाची इन्फोटेन्मेंट सिस्टम दिली जाणार असून अॅण्ड्रॉयड आणि अॅपल प्लेअरही उपलब्ध आहे. जास्त मायलेज देणाऱ्या या कारच्या नव्या सँन्ट्रोमध्ये चार सिलेंडरचे १.१. लीटरचे पेट्रोल मोटार इंजिन दिले आहे. याशिवाय सीएनजीचा पर्यायही दिला जाणार आहे. कारमध्ये १३५ सीसीचा एसी कॉम्प्रेसर आहे.
 


 
 

ऑनलाईन बुकींग सुरू : कंपनीत तीन वर्षांसाठी १ लाख किलोमीटरची वॉरंटी आणि रोड साईड असिस्टंट सेवा देण्यात येणार आहे. १० ऑक्टोबरपासून सुरू या कारसाठी ऑनलाईन बुकींग सुरू झाली असून २२ ऑक्टोबरपर्यंत खुली राहणार आहे. पहिल्या ५० हजार ग्राहकांसाठी केवळ ११ हजार १०० रुपयांमध्ये बुकींग करता येणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/