गुगल प्लस होणार बंद
महा एमटीबी   09-Oct-2018

 


 
 
सॅनफ्रान्सिसको : फेसबुकला टक्कर देण्यासाठी गुगलने निर्माण केलेली गूगल प्लस ही सोशल नेटवर्किंग साईट ही बंद करण्यात येणार असल्याची घोषणा गुगलकडून करण्यात आली. यूजर्सच्या अल्प प्रतिसादामुळे ही साईट बंद करण्यात येत असल्याचे गुगलने म्हटले. परंतु या साईटवरून यूजर्सची गोपनीय महिती चोरीला गेली असल्याची सर्वत्र चर्चा आहे. 
 

गुगल प्लस ही साईट ७ वर्षे सुरू होती. परंतु तिच्यावरून गुगलचा डेटा चोरीला गेला होता. २०१५ पासून हा डेटा चोरला जात होता. गुगलच्या सुरक्षा पथकाने यावर काम केले होते. डेटा सुरक्षित असल्याचे या पथकाकडून सांगण्यात आले. परंतु हा डेटा कोणत्या संस्थेने चोरला होता, तसेच त्यामागील हेतू काय होता हे सांगण्याचे गुगलकडून टाळण्यात आले. गुगल प्लसद्वारे होत असलेली ही डेटाचोरी थांबवू शकत नसल्याने गुगलने हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/