'बेस्ट'चे तिकीट आता क्रेडिट, डेबिट कार्डवर मिळणार
महा एमटीबी   09-Oct-2018मुंबई : आता मुंबईकरांसाठी एक खुशखबर आहे. बेस्टमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना क्रेडिट, डेबिट कार्डवर तिकीट मिळणार आहे. याबाबतची घोषणा बेस्टच्या अर्थसंकल्पात करण्यात आली असून येत्या वर्षात क्रेडीट व डेबिट कार्डद्वारे तिकीट काढता येणार आहे. बेस्टने सुरु केलेली ट्रायमॅक्स तिकीट प्रणाली बंद झाल्यामुळे पुन्हा एकदा कागदी तिकीट फाडून बेस्टकडून तिकीट आकारणी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर बेस्टने हा निर्णय घेतला आहे.

 

बेस्टच्या या निर्णयामुळे सुट्यापैशांवरून प्रवाशी आणि वाहकांमध्ये होणाऱ्या बाचाबाचीचे प्रमाण कमी होणार आहे. त्याचबरोबर राज्य सरकार एकच प्रवास कार्ड ही योजना राबवणार आहे. यामध्ये उपनगरीय रेल्वे, बेस्ट, मेट्रो, मोनो आदींसाठी एकच प्रवास कार्ड असणार आहे. यामध्ये बेस्टने देखील सामील होण्याचा निर्णय घेतल्याने बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा व प्रवाशांचा ताण वाचणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/