या ५ उपायांनी ऑक्टोबर हीटवर करा मात
महा एमटीबी   09-Oct-2018

 

 
 
 
ऑक्टोबर महिना सुरू झाला की उकाडा जाणवू लागतो. उन्हाळा वर्षात दुसऱ्यांदा सुरू झाला की काय असे वाटू लागते. या हीटचा सामना करण्यासाठी करा हे उपाय....
 

भरजरी कपडे घालणे टाळा!

 

 
 

ऑक्टोबरच्या या उकाड्यात भरजरी कपडे घालणे शक्यतो टाळाच. लग्नसमारंभात भरजरी कपड्यांशिवाय लूकला शोभा येत नाही, पण कम्फर्टचे काय? तुम्ही भरजरी कपडे घालून जर या उकाड्यात बाहेर पडलात तर शरीराला आलेल्या घामामुळे हे कपडे अंगाला चिकटलेच म्हणून समजा. तसेच या हवामानात जॅकेट, स्टोल, श्रग घालणे टाळा. साधे, हलके, फिकट रंगाचे कपडे घाला. असे कपडे घाला जेणेकरून ज्यातून हवा खेळती राहील आणि घामही सुटणार नाही.

 

मेकअप कमी करा.

 

 
 

उकाडा असल्याने जास्त मेकअप करू नका. घामामुळे मेकअप तर खराब होईलच पण त्याचबरोबर त्वचेचेदेखील नुकसान होऊ शकते.

 

पाण्याची जवळ बाटली ठेवा.

 
 

 

 

उन्हामुळे डिहायड्रेशन होऊ नये म्हणून पाण्याचे घोट थोड्या थोड्या वेळाने घेत राहा. आपल्या पर्समध्ये पाण्याची बाटली कायम असू द्या.
 

घट्ट चप्पल वापरू नका.

 
 

 

 

पायाला घट्ट टाइट बसणारी चप्पल किंवा शूज घालणे टाळा. त्यामुळे पायाच्या त्वचेवर वळ उठू शकतात. तसेच शक्यतो पायात मोजे घालणे टाळा. पायाला सुटलेला घाम अशा हवामानात मोज्यांमध्ये साठून राहतो. त्यामुळे मोज्याला दुर्गंधी सुटते.
 

११ ते ३ यावेळेत बाहेर पडू नका.

 

 
 

सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत भर उन्हात बाहेर जाणे टाळा. त्यामुळे उन्हाची झळ बसून डोके गरगरणार नाही, डिहायड्रेशन, घसा सुकणे असे त्रास उद्भवणार नाहीत. यावेळेत उन्हात बाहेर पडलातच तर आपले डोक्याभोवती स्कार्फ गुंडाळा किंवा टोपी, हॅट वापरून डोके उन्हापासून झाकण्याचा प्रयत्न करा. डोळ्यांना सनग्लासेस लावायला विसरू नका.

 - साईली भाटकर

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/